Raosaheb Danve : मराठवाड्यातला बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार? दानवेंचा सूचक इशारा
Raosaheb Danve : मराठवाड्यातला बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार? दानवेंचा सूचक इशारा
मुंबई : मराठवाड्यातील ठाकरेंचा बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणुका आहेत, धक्क्यावर धक्के बसणार असा मोठा दावा मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. 4 जूनला मोठा धक्का बसणार, या रावसाहेब दानवे यांच्या दाव्याने भुवया उंचावल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
धक्क्यावर धक्के बसणार, रावसाहेब दानवेंचा दावा
मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं की, मला जालन्यातून उमेदवारी जाहीर केली आहे. मराठवाड्यातील काही जागा जाहीर झाल्या आहेत, तर काही जागांबाबत चर्चा सुरु आहेत. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मी आलो होतो. मराठवाड्यातील कोणता नेता जाणार या प्रश्नावर उत्तर देताना दानवे म्हणाले की, आमच्या विचाराचा नेता असेल तर त्याला आमच्या पक्षात आणण्याचे काम आम्ही करत असतो.




















