Ramdas Athwale On Prakash Amedkar: वेळ आल्यास माझं मंत्रिपदही प्रकाश आंबेडकरांना देईन
Ramdas Athwale On Prakash Amedkar: वेळ आल्यास माझं मंत्रिपदही प्रकाश आंबेडकरांना देईन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद नागपुरात होत आहे... मला तीन वेळेला मोदी सरकार मध्ये मंत्रीपद मिळाले, कार्यकर्त्यांमुळे हे झाले.. मला रिपब्लिकन पँथरच्या काळापासून नागपूर आणि विदर्भाने भक्कम साथ दिली.. सध्या ज्या सरकार मध्ये आहे, ते पाच वर्ष चालणारे सरकार असून पूर्ण बहुमत आहे.. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू आमच्या सोबत असून पुढे ही सोबत राहतील.. पूर्वी ही असे सरकार चालले आहे.. आम्हाला विदर्भात कमी जागा मिळाल्या, तो भाजपचा बालेकिल्ला होता.. मात्र, जागा मिळाल्या नाही.. मराठवाड्यात ही यश आले नाही.. सविंधान बदलला जाईल या चर्चेमुळे असे घडले.. इथे आंबेडकरी विचार भक्कम आहे... मोदी यांनी संविधानाला डोकं टेकवून शपथ घेतली आहे.. लंडन चे घर असो, इंदु मिल चे काम असो सर्वात मोदींचे योगदान आहे.. त्यांच्या काळात हे काम झाले असताना मोदी कधी ही संविधान बदलणार नाही.. मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेस पक्षाने कधी कर्नाटकात cm केले नाही.. खरगे म्हणतात आमचे सरकार आले असते तर NDA चे सर्व नेते आत राहिले असते.. आता NDA चे सरकार असताना तुम्ही आणि तुमच्या पक्षातील सर्व नेते बाहेर आहे.. त्यामुळे खोटे प्रचार करू नका... येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला किमान 10 ते 12 जागा द्याव्या.. माझ्या पक्षासोबत मोठ्या प्रमाणात दलित मतदार आहेत.. वंचित बहुजन आघाडीला राज्यात म्हणावे यश मिळालेले नाही.. आम्ही लोकसभेला 2 जागा मागितल्या होत्या, मात्र मिळाल्या नाही... आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला 12 जागा द्या.. विदर्भात किमान 4 जागा द्याव्या.. महाराष्ट्रात आम्ही 18 जागांची यादी केली आहे.. त्यापैकी 12 जागा द्याव्या.. आम्हाला भाजपच्या कोट्यातून मानू नये.. तर भाजप, शिंदे आणि अजित दादा तिघांनी आम्हाला त्यांच्या कोट्यातून 4 - 4 जागा द्याव्या... म्हणजे आम्हाला 12 जागा मिळतील... येणाऱ्या nda सरकार मध्ये आम्हाला मंत्री पद द्याव्या, तसेच 2 महामंडळ तरी द्याव्या... फडणवीस चतुर नेते आहे.. ते आमची ताकत ओळखतील... आरक्षण कोणी हटवू शकत नाही.. राहुल गांधी मात्र आरक्षण हटवू शकतात.. ते देशाच्या बाहेर जाऊन देशाची बदनामी करतात.. मी तर मागणी करतो त्यांचे पासपोर्ट जप्त केले पाहिजे.. राहुल गांधींच्या विरोधात देशभर निषेध आंदोलन झाले आहे.. मात्र त्यांची जीभ छाटली पाहिजे असे वक्तव्य करणे योग्य नाही.. सध्या महाराष्ट्राचे राजकारण चुकीच्या दिशेने जात आहे ( बेताल वक्तव्याबद्दल) 3 oct ला सातारा येथे आमच्या पक्षाचा स्थापना दिवस साजरा करू... (महायुतीत आधीच तिन्ही पक्षात जागांची मारामारी असताना तुम्हाला 12 जागा आणि प्रत्येकाच्या कोट्यातून 4 जागा कशा मिळतील?? या प्रश्नावर..) महायुतीत सर्व पक्षांच्या जागांच्या मागण्या आहे.. मी काही अवास्तव मागणी केलेली नाही.. मी 12 जागा मागितल्या आहे.. चर्चेत याबद्दल काही कमी जास्त होऊ शकते.. या जागा मात्र आम्ही आमच्या चिन्हावर लढवू...
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)