Raj Thackeray vs Chandrashekar Bawankule : लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंनी टीका, बावनकुळेंचा पलटवार
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जोरदार टीका केलीय..
लाडकी बहीण योजनेमुळं सरकारडे जानेवारी महिन्यापासून कर्मचाऱ्यांना पगार द्यायलाही पैसे राहणार नाहीत असं राज ठाकरे म्हणालेत... अमरावतीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय..
शेतकऱ्यांनी मोफत वीज द्या म्हणून कधीच आंदोलन केलं नाही.. तरीही सरकारनं मोफत वीजेची घोषणा का केली असा सवालही राज ठाकरेंनी विचारलाय..
लाडकी बहीण योजनेवरुन राज ठाकरेंपाठोपाठ महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही सरकारवर निशाणा साधलाय.. लाडकी बहीण योजना म्हणजे निवडणुकीआधी महिलांना लाच देण्याचा प्रकार आहे असं काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्यात... यासाठीच निवडणुकाही लांबणीवर टाकल्याचा दावा प्रणिती शिंदेंनी केलाय... तर लाडकी बहीण योजना ही लाडकी खुर्ची योजना असल्याचा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावलाय..