Raj Thackeray Full Speech : मराठीचा मुद्दा, हिंदुत्वाची भूमिका; भावाला टार्गेट,पवारांवर घणाघात
Raj Thackeray : मनसेचा 18 वा वर्धापन (MNS Vardhapan Din) दिन सोहळा आज नाशिकमध्ये पार पडला. या मेळाव्यातून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तोफ डागत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. मराठ्यांनो यांच्या भुलपाथांना बळी पडू नका, अरबी समुद्रातील शिवस्मारकाबाबत राज ठाकरेंनी सरकारचे वाभाडे काढले आहे. राज ठाकरे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना सांगितले मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) काही होणार नाही. तांत्रिकदृष्ट्या ते टिकणार नाही, यांच्या भूलथापांना बळी पडू नका. जी गोष्ट होऊ शकत नाही त्याचे आश्वासन सरकार देत आहे. महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य शिक्षण रोजगार देऊ शकत नाही. बाहेरील राज्याचे लोक पोसायची आणि आम्ही आंदोलन करायची. जातीजातीत विष कालवले जात आहे. महाराष्ट्र एकसंघ ठेवत नाही. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलेत हे यांना