मनसेच्या बॅनरवर Raj Thackeray यांचा हिंदुहृदयसम्राट म्हणून उल्लेख, राजकीय वर्तुळा जोरदार चर्चा
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिनसैनिक हिंदुहृदयसम्राट म्हणत, आता मनसे ने हिंदुत्त्वचा मुद्दा हाती घेऊन थेट राज ठाकरे यांनाच हिंदुहृदयसम्राट म्हणण्यास सुरुवात केली आहे.आज घाटकोपर मध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालय चे उद्घाटन आहे.यासाठी राज ठाकरे यांच्या स्वागताचे भले मोठे बॅनर्स मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर परिसरात लावले आहेत.यात राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदू हृदय सम्राट लावण्यात आले आहे.मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना आता मनसेने शिवसेनेचा हिंदुत्वचा मुद्दा हाती घेतलाच होता, त्यातच थेट राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखी हिंदूहृद्यसम्राट म्हंटल्याने या बॅनर्स ची चर्चा होत आहे.























