एक्स्प्लोर
Principal Assault | लातूरमध्ये मुख्याध्यापकाला मारहाण, फीवरून वाद
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील महात्मा गांधी विद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीचा शाळा सोडण्याचा दाखला (TC) काढण्यासाठी आलेल्या एका युवकाने मुख्याध्यापकांना मारहाण केली. रोहन कांबळे असे मारहाण करणाऱ्या युवकाचे नाव आहे. शाळा सोडण्याच्या दाखल्यासाठी (TC) २०० रुपये फी का द्यावी, असा प्रश्न या युवकाने विचारला. "दोनशे रुपयेची पावती द्या, अर्ज देतो मग टीसी द्या," असे युवकाचे म्हणणे होते. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच टीसी मिळेल असे मुख्याध्यापकांनी सांगितल्यानंतरही युवकाने विनाकारण गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या वादामधूनच त्याने मुख्याध्यापकांच्या श्रीमुखात भडकावली. या घटनेमुळे संतापलेल्या शाळा कर्मचाऱ्यांनी मारहाण करणाऱ्या युवकाला चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिक्षण क्षेत्रात अशा घटनांमुळे चिंता व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र
Omkar Elephant: धुडगूस घालणाऱ्या ओंकार हत्तीला वनतारात नेणार
Delhi Blast Umar DNA Match : दिल्ली स्फोटात I 20 चालवणार डॉ. उमरच, डीएनए चाचणीवरुन स्पष्ट
Exercise Trishul: आम्ही युद्धासाठी सदैव तत्पर, Pakistan सीमेजवळ Army, Navy, Air Force चा युद्धाभ्यास
MCA Elections 2025: Jitendra Awhad उपाध्यक्षपदी, Ajinkya Naik बिनविरोध अध्यक्ष, ही आहे नवी टीम
Jai Shri Ram Row: 'जय श्रीराम' म्हटल्याने विद्यार्थ्याला मारहाण, Pen मधील शिक्षक Momin पोलिसांच्या ताब्यात
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















