एक्स्प्लोर
Pramod Mahajan Family : 'ते देश काय सांभाळणार?' महाजन कुटुंबात मोठी फूट
दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांच्या हत्येवरून तब्बल १९ वर्षांनी पुन्हा एकदा कौटुंबिक वाद उफाळून आला आहे. महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन (Prakash Mahajan) आणि त्यांचे दुसरे भाऊ प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन (Sarangi Mahajan) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 'आमच्या घरातला वाद ते सावरू शकले नाहीत, तर ते देशाला कसे सांभाळू शकले असते?' असा थेट सवाल सारंगी महाजन यांनी उपस्थित केला आहे. प्रकाश महाजन यांनी आरोप केला आहे की, प्रमोद महाजन यांची हत्या केवळ पैशांच्या हव्यासातून आणि ऐषारामासाठी झाली होती. यावर उत्तर देताना, ब्लॅकमेल केले असते तर आज आम्ही 'सी-फेस' बंगल्यात राहिलो असतो, असे म्हणत सारंगी महाजन यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी कोर्टात प्रवीण महाजन यांच्या विरोधात साक्ष दिल्यामुळेच त्यांच्या कन्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर टीका होत असल्याचा आरोपही प्रकाश महाजन यांनी केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















