Police Bharti : पोलीस भरतीत डमी उमेदवार पाठवल्याचं समोर, तरूणांविरोधात गुन्हा दाखल
Continues below advertisement
एकीकडे राज्यात शिक्षकभरतीच्या घोटाळ्याचं प्रकरण गाजत असताना आता पोलीस भरतीतले गैरप्रकारही समोर येतायत.. महाराष्ट्र पोलीसात भर्ती होण्यासाठी एका महाभागानं डमी उमेदवार पाठवल्याचं समोर आलंय. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी पुणे आणि औरंगाबादच्या दोन युवकांविरोधात गुन्हा दाखल केलाय. आरोपी सोपान शेलार यांनी भरतीसाठी अर्ज भरला मात्र प्रत्यक्ष भरतीच्या वेळी ओळखपत्रावर ज्ञानेश्वर गोवळकोंडा याचा फोटो लावून परीक्षेला पाठवलं. कागदपत्राच्या छाननी वेळी ही फसवणूक उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी सोपानला अटक केलंय तर ज्ञानेश्वर फरार आहे.. अशा प्रकारची 8 प्रकरणं यापूर्वी उघडकीला आली आहेत.
Continues below advertisement
Tags :
Abp Majha ABP Maza Police Recruitment ABP Majha Police Bharti Police Recruitment Dummy Candidate Dummy Candidate