PM Modi Oath Ceremony Invitation : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या निमंत्रण पत्रिकेत नेमकं काय?
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रविवारी संध्याकाळी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. रविवारी संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात मोदींच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीचा (Narendra Modi oath taking ceremony) सोहळा पार पडेल. यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए सरकारमधील (NDA Govt) काही मंत्र्यांनाही शपथ दिली जाईल. या मंत्र्यांमध्ये महाराष्ट्रातील काही खासदार असण्याची शक्यता आहे. यापैकी पहिल्या खासदाराचे नाव निश्चित झाले झाले. अजितदादा गटाचे प्रफुल पटेल (Praful Patel) यांना केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश निश्चित असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल पटेल यांच्याच नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, यांच्या बैठकीत प्रफुल पटेल यांची मंत्रिपदासाठी निवड करण्यात आली. उद्या राष्ट्रपती भवनात होणाऱ्या सोहळ्यात प्रफुल पटेल कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d877e01e65ffa6ad741d16fb30b06fd71739886484727977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/317ce4712984847b3864b7b10235449d1739884286047977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhaji Maharaj Wikipedia | संभाजी महाराजांबाबत विकीपीडियावर आक्षेपार्ह मजकूर, शिवप्रेमींमध्ये संताप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/2a247cc6697d594b2f91b2c8844dc83b1739879233835977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f65ce86b980e3b8da7e5336ea09ecb1a1739878805790977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas on Dhananjay Munde Meets | आजारी असल्यामुळे माणुसकीच्या नात्याने मुंडेंना भेटायला गेलो- सुरेश धस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/e68f96642d2e022842e57fe57616c8b31739877995977977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)