एक्स्प्लोर

Pimpari Chinchwad Online Game kill : त्याने एकच चूक केली, गेमचा टास्क पूर्ण करताना मुलाची उडी, आईचा आक्रोश

हावीत शिकणाऱ्या मोबाईल गेमचं व्यसन जडलं. या व्यसनाच्या आहारी तो इतका गेला की, त्याला इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारण्याचा टास्क आला. जो त्याने फॉलो केला. यात या मुलाचा मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडच्या किवळे भागात घडली आहे. 26 जुलैची रात्र या मुलासाठी अखेरची ठरली. गेल्या सहा महिन्यांपासून हा मुलगा गेमच्या आहारी गेला होता. त्यानंतर तो स्वतःला बेडरूममध्ये तीन-तीन तास कोंडून घेत असे. खोलीत एकटाच बडबड करत असायचा. आजवर घाबरणारा मुलगा थेट किचनमधील चाकूची मागणी करायला लागला होता. वेगवेगळे टास्क त्याला येऊ लागले, जे तो फॉलो करत गेला. हा बदल पाहून आई-वडील ही चिंतेत होते. अतिवृष्टीमुळं 25 जुलैला शाळांना सुट्टी होती, तो ही दिवस त्याने गेम खेळण्यातचं घालवला. मग रात्री अनेक विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर पडला. मात्र जेवण केल्यावर पुन्हा तो खोलीतचं जाऊन बसला. आई दुसऱ्या मुलाला ताप आल्यानं त्या चिंतेत होती. रात्रीचा एक वाजला मुलाचा ताप काय उतरेना, त्यामुळं आई जागीचं होती. त्याचवेळी सोसायटीच्या व्हाट्सएपवर एक मुल जखमी अवस्थेत खाली पडल्याचा मेसेज आला. तो मेसेज मुलाच्या आईने वाचला अन तिला थोडी कुणकुण लागली. मग ती खोलीच्या दिशेने गेली, खोली आतून बंद होती. दुसरी चावी घेऊन खोली उघडली पण मुलगा आत नव्हता, त्यानंतर धावाधाव करत ती जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ पोहचली, बघते तर काय? तो तीचाचं मुलगा होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोटच्या लेकाला पाहून, आईची पायाखालची जमीनचं सरकली. मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेहण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घरात गेममधील कोडिंगच्या भाषेत लिहिलेली अनेक कागदं आढळली. त्यावर घराचं स्केच होतं आणि गॅलरीतून जम्प कर, असा टास्क ही नमूद होता. जो त्याने फॉलो करत 14व्या मजल्यावरून उडी घेत संपवला. मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी आणि त्याकडे कानाडोळा करणाऱ्या पालकांसाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. या घटनेतून ते धडा घेतील आणि अशा धक्कादायक घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. याची ते आत्ताच तातडीनं खबरदारी घेतील, अशी अपेक्षा आहे. तसेच सरकार ने अशा गेमिंग वर कायमस्वरूपी बंदी आणावी अशी मागणी ही आत्महत्या करणाऱ्या मुलाच्या आई-वडिलांनी केलीये. या मुलाच्या आई-वडिलांशी बातचीत केलीये नाजिम मुल्ला यांनी. 

महाराष्ट्र व्हिडीओ

CM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे प्रयत्न
CM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे प्रयत्न

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

CM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे प्रयत्नSanjay Raut on Shivsena Advertisenment : शिंदेंच्या शिवसेनेची जाहीरात; राऊतांचा पलटवारSharad Pawar Bag Checking Baramati : बारामतीत शरद पवारांच्या बॅगची तपासणीNagpur Congress :भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी काढले प्रियंका गांधींचे होर्डींग्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी विमानतळावर दिसताच ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Embed widget