एक्स्प्लोर
Phaltan Doctor Case: 'पुरावे नष्ट करून आरोपी सरेंडर झाला', कुटुंबीयांचा गंभीर आरोप
फलटणमधील डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण आलं असून, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. 'लवकरात लवकर एसआयटी समितीची स्थापना करण्यात यावी,' अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या फलटण दौऱ्याच्या काही काळ आधीच आरोपी शरण आल्याने, त्याने पुरावे नष्ट करून आत्मसमर्पण केले असा दावा महिलेच्या भावाने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही कुटुंबीयांनी दिला आहे. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरत आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement















