Pankaj Udhas : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन, Anup jalota यांनी उधास यांच्या आठवणींना उजाळा दिला
Pankaj Udhas : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन, Anup jalota यांनी उधास यांच्या आठवणींना उजाळा दिला
आता बातमी आहे, प्रत्येक संगीतप्रेमीच्या काळजात चर्रर्र करायला लावणारी. ज्येष्ठ पार्श्वगायक पंकज उधास यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतलाय. अवघ्या संगीतविश्वाला आपल्या निरागस, गोड, मधूर, लाघवी आणि तितक्याच विरहसुरांची झालर बहाल करणाऱ्या पंकज उधास यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी रसिकांना पोरकं केलंय. ना कजरे की धार म्हणत, श्रूगांररसाने वातावरण भारून टाकणारे, चाँंद के जैसा रंग है तेरा म्हणत, पडद्यावरील नायिकेच्या यथार्थ वर्णनाला आवाजाने सजीव करणारा हा शायरीतला शेर खऱ्या अर्थाने आज निघून गेल्याची भावना संगीतप्रमींमध्ये निर्माण झाली नसेल तरच नवल.





















