Pandharpur Vitthal Mandir : विठ्ठलभक्तांसाठी खुशखबर! आता कधीही करा विठूरायाची तुळशीपूजा
देशभरातील भाविकांसाठी खुशखबर. आता पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात केव्हाही आलात तरी तुम्हाला देवाच्या चरणावर तुळशी वाहून तुळशी अर्चन पूजा करता येणार आहे. गुढीपाडव्यापासून तुळशी अर्चन पूजेला पुन्हा सुरुवात होणार आहे... देशभरातील भाविक पंढरपुरात आल्यानंतर अनेकांना देवाची पूजा करण्याची इच्छा असते. मात्र मोजक्याच होणाऱ्या पुजा आणि आणि वर्षभरापासून करावं लागणारं बुकिंग यामुळे भाविकांना तुळशी अर्चन पूजा करण्याची इच्छा पूर्ण करता येत नव्हती... आता मात्र दिवसभरात तीन वेळा या पूजा होणार असून प्रत्येक स्लॉटमध्ये 10 कुटुंबं या पूजेत सहभागी होतील. गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांची तुळशी अर्चन पूजेची मागणी प्रलंबित होती... आता गुढीपाडव्यापासून देवाच्या चरणावर तुळशी वाहून पूजा करता येणार आहे.. यामुळे मंदिराच्या उत्पन्नातही मोठी वाढ होईल..























