एक्स्प्लोर

पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांचे लसीकरण करुनच पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा, नगराध्यक्षांची मागणी

पंढरपूर :  यंदा आषाढी यात्रा पायी होणार की बसने याचा घोळ केव्हाही सुटो मात्र पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या महाराज आणि वारकऱ्यांचे लसीकरण करूनच त्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा अशी मागणी पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले यांनी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फार मोठा फटका पंढरपूर परिसराला बसल्याने यंदा गेल्यावर्षी प्रमाणे प्रातिनिधिक स्वरूपातच वारी करण्याची भूमिका पंढरपूर मधील नागरिकांची आहे. 

संतांच्या मानाच्या सातही पालखी सोहळे थांबत असलेले मठ हे प्रदक्षिणा मार्गावर असून शहराची सर्वात जास्त लोकसंख्या प्रदक्षिणा मार्गाच्या आतल्या बाजूस आहे. यामुळे येणारे वारकरी लसीकरण करून आले तर नागरिकांना धोका कमी वाटेल अशी भूमिका नगराध्यक्ष साधना भोसले यांनी व्यक्त केली. अशाच पद्धतीची भूमिका प्रदक्षिणा मार्गावरील कुटुंबांनी देखील मांडली आहे. 

अजूनही पंढरपूरमध्ये कोरोना आणि म्युकरमायकोसिसचे रोज नवनवीन रुग्ण सापडत आहेत. आत्तापर्यंत पंढरपूरमध्ये 24731 कोरोनाचे रुग्ण सापडले असून सध्या 555 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे अधिकृत सरकारी आकड्यानुसार आतापर्यंत 480 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यात  म्युकरमायकोसिसचे 419 रुग्ण सापडले असून यात 35 जणांचा मृत्यू झाला असल्याने नागरिकांत अजूनही कोरोनाची दहशत कायम आहे. 

सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे वेदांत आणि व्हिडीओकॉन या भक्त निवासाला कोविड  केअर सेंटर केले आहे. तर मंदिराजवळील संत गजानन महाराज मठही शहरातील कोविड  रुग्णांसाठी ठेवण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या निवासासाठी बनविलेले 65 एकरावरील भक्ती सागर हा निवासतळही कोविड हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटरसाठी वापरलं जात आहे . अशावेळी पालखी सोहळ्यासोबत येणारे वारकरी यंदा दशमी ते द्वादशी असा 6 दिवस मुक्काम करणार असल्याने नागरिकांची भीती वाढली आहे. 

गेल्यावर्षी दशमीला आलेल्या पालख्या द्वादशीला परत फिरल्या होत्या. यंदा मात्र वारकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने दोन दिवसाचा मुक्काम परंपरेप्रमाणे पौर्णिमेपर्यंत वाढवला आहे. आषाढी सोहळा हा पंढरपुरातील नागरिकांना दिवाळीपेक्षा मोठा असला तरी यंदाची परिस्थिती गेल्यावेळीपेक्षा भीषण असल्याने वारीचे नियोजन करताना पंढरपूरच्या नागरिकांचाही विचार करावा अशी मागणी नगराध्यक्षांनी केली आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव : 7July 2024
Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव : 7July 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव : 7July 2024ABP Majha Headlines :  6:30AM : 7 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavikant Tupkar : बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीचं निमंत्रण दिलं : तुपकरSpecial Report Maharashtra Politics | 11 कोटींच बक्षीस, विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर 'बोलंदाजी'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
Embed widget