Pandharpur : तुळशी वृंदावनमधील 8 पैकी 2 संतांची मंदिरं कोसळली
Pandharpur : तुळशी वृंदावनमधील 8 पैकी 2 संतांची मंदिरं कोसळली
२०१९ साली पंढरपुरात वनविभागानं एक वृंदावन उभं केलं.. त्याच तुळशी वृंदावनाचं लोकार्पण झालं, पण, काही महिन्यातच हे वृंदावन वादात अकडण्याची शक्यता आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी या ठिकाणंच आकर्षण वाढतं असतानाच, इथल्या काही मंदिरांमध्ये पडझड झाली. वन विभागाच्या तुळशी वृंदावनमधील 8 पैकी 2 संतांच्या मंदिरं कोसळल्याने इतर मंदिरं आणि 23 फुट उंचीच्या विट्ठल मूर्तीचं अस्तित्व धोक्यात आलंय. 6 कोटी रुपये खर्चून श्री यंत्राच्या आकारात उभारलेल्या या तुळशी वृंदावनाला दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. आता येथील मंदिरांची पडझड झाल्याने वनमंत्री मुनगंटीवारांनी या प्रकल्पाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिलेेत.























