Pakistan Terror Camp: लष्कर ए तोयबाचं मुख्यालय उद्धवस्त, धक्कादायक व्हिडिओ समोर
Pakistan Terror Camp: लष्कर ए तोयबाचं मुख्यालय उद्धवस्त, धक्कादायक व्हिडिओ समोर
हे ही वाचा.
पाकिस्तानी दहशतवाद (Pakistani Terrorism) आणि पाकिस्तान सरकार (Pakistan Government) हे काही वेगळं नाही हे पुन्हा एकदा जगासमोर आलंय. बुधवारी भारताानं ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) करत पाकिस्तानच्या (Pakistan) पेकाटात लाथ घातली. त्यानंतर पाकिस्तानचा खरा दहशतवादाचा चेहरा जगासमोर आला. पाकिस्तानी दहशतवादी हे पाकिस्तानी सरकारचे जावई असल्यासारखी वागणूक दिली जात आहे, हे काल भारतानं सिद्ध केलं. तसेच, भारतानं धडा शिकवल्यानंतर आता पाकिस्तान बराच बिथरला असून पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.
भारताच्या हल्ल्यानंतर पाकमध्ये हालचाली (Movement in Pakistan After India's Attack) वाढल्याचं पाहायला मिळतंय. पाककडून ताबा रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर जमवाजमव सुरू झाली आहे. पाकिस्तानकडून युद्धसामग्री आणि रणगाडेही तैनात करण्यात आले आहेत. तर, लाहोरमध्ये 'नोटीस टू एअर मिशन' जारी करण्यात आलं आहे. लाहोरकडे जाणारी-येणारी सर्व विमानं रद्द करण्यात आलीत. त्यासोबतच पाकिस्तानकडून सीमावर्ती भागातली गावंही रिकामी करण्यात आली आहे.























