Vaccination : 15 ते 17 वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणासाठी पालकांची लेखी संमती आवश्यक नाही
15 ते 17 वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणासाठी पालकांची लेखी संमती आवश्यक नसल्याचं राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. कोविन अॅपवरची नोंदणी हीच पालकांची संमती आहे अशी राज्य सरकारची भूमिका आहे. राज्य सरकारच्या रोगप्रतिकारकशक्ती विभागाशी संबंधित डॉक्टर सचिन देसाईंनी माध्यमांना ही माहिती दिलीय. 15 ते 17 वयोगटातील मुला-मुलींचं शाळा आणि कॉलेजच्या आवारात लसीकरण करण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत. त्यानंतर अनेक शाळा आणि कॉलेजच्या प्रशासनामध्ये पालकांच्या संमतीसंदर्भात संभ्रम होता. मात्र राज्य सरकारनं हा संभ्रम आता दूर केलाय. दरम्यान लसीकरणावेळी पालकांनी मुलांसोबत उपस्थित राहण्याचा सल्ला मात्र तज्ज्ञांकडून देण्यात येतोय.






















