(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitin Sardesai On Graduate Constituency : कोकण पदवीधर मदतदारसंघ निवडणुकीतून मनसेची माघार
Nitin Sardesai On Graduate Constituency : कोकण पदवीधर मदतदारसंघ निवडणुकीतून मनसेची माघार
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना बिनशर्त पाठींबा देत महायुतीच्या सभांमध्ये (Mahayuti) सहभागी झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाकडून अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांची उमेदवारी जाहीर करुन भाजपला धक्का दिला होता. त्यानंतर मनसे वि. भाजप असा सामना रंगणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर राज ठाकरेंची मनधरणी करण्यात भाजपला यश आले असून कोकण पदवीधर निवडणुकीतून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) माघार घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर कोकण पदवीधरची निवडणुकीची चुरस रंगात आली होती. भाजप वि. मनसे सामना रंगणार या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर भाजपने हालचाली करत राज ठाकरेंची मनधरणी करण्यासाठी निरंजन डावखरे आणि प्रसाद लाड यांना राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर पाठवले. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. सकाळीच शिवतिर्थावर पोहचलेल्या प्रसाग लाड आणि निरंजन डावखरे यांना राज ठाकरेंची मनधरणी करण्यात यश मिळाले. त्यानंतर राज ठाकरेंनी माघार घेण्याचा निर्णय घेतला.