Nitin Gadkari Nagpur Bus : विमानासारख्या सुविधा बसमध्ये मिळणार, गडकरींनी सांगितलेली बस नेमकी कशी?
Nitin Gadkari Nagpur Bus : विमानासारख्या सुविधा बसमध्ये मिळणार, गडकरींनी सांगितलेली बस नेमकी कशी?
नागपूरात मेट्रो सह अनेक उड्डाणपूल बांधल्यानंतर आता गडकरींनी नागपुरात अत्याधुनिक आणि विमानासारखी सोय असलेल्या बस सेवेचे नवीन स्वप्न पाहिले आहे. नागपूरच्या अगदी जवळ वसलेल्या वाडी सह संपूर्ण रिंग रोड वर 50 किमी अंतरापर्यंत विशेष इलेक्ट्रिक बस सुरू केली जाणार असल्याचे आज गडकरींनी जाहीर केले.. विमानासारख्याच अत्याधुनिक सोयींनी युक्त ही बस स्कोडा आणि टाटा कंपनीचा संयुक्त उपक्रम असून त्याला अत्यंत कमी कालावधीत चार्ज करण्यासाठीचे तंत्रज्ञान जपानच्या हिताची कंपनीने विकसित केले आहे... वातानुकूलित बस मध्ये एक्झिक्यूटिव्ह खुर्च्या आवश्यकतेनुसार लॅपटॉपची सोय, खाण्यापिण्यासाठीचे पदार्थ उपलब्ध राहणार आहेत.. नागपूरच्या अवतीभवती पसरलेल्या रिंग रोडवर पन्नास किलोमीटर अंतरापर्यंत पहिल्यांदा ही बस सुरू केली जाणार असून त्या माध्यमातून नागपूरच्या अवतीभवतीच्या उपनगरात राहणाऱ्या लोकांना नागपूर शहरात येणे सोयीस्कर होणार आहे...