Sharad Pawar gets Discharge : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पवार निवासस्थानी परत
शरद पवार (Sharad Pawar) यांना गेल्या मंगळवारी पोटदुखी बळावल्यामुळं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मंगळवारी (30 मार्च) उशिरा रात्री पित्ताशयामध्ये (Gallbladder) अडकलेला मोठा खडा बाहेर काढण्यात आला. एन्डोस्कोपीद्वारे ही शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे शरद पवारांना पोटदुखीपासून आराम मिळणार आहे. मात्र, शरद पवारांच्या गॉल ब्लॅडरमध्ये छोटे-छोटे खडे असल्याने काही दिवसात त्यांचे गॉल ब्लॅडरही काढण्यात येणार आहे. यासंदर्भात देखील डॉक्टर निर्णय घेणार आहेत. दरम्यान, गॉल ब्लॅडर जरी शस्रक्रिया करुन काढण्यात येणार असले तरी हा अवयव काढल्यानंतर शरद पवारांचे काहीही नुकसान होणार नाही, अशी माहिती शरद पवारांवर उपचार करणारे डॉ. मायदेव यांनी दिली होती.























