Nashik :नाशिकमधील हायप्रोफाईल दुहेरी हत्येचं गूढ उकललं,बापलेकाचा संपत्तीसाठी घेतला जीव : ABP Majha
नाशिकमधील हायप्रोफाईल दुहेरी हत्येचं गूढ उकललं आहे. एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटावं अशा या दुहेरी हत्येचा डीमॅट अकाऊंटवरून झालेल्या व्यवहारांच्या आधारे पोलिसांनी छडा लावला. आणि एका सधन बापलेकाचा त्यांच्या संपत्तीसाठी जीव घेणाऱ्या उच्चशिक्षित आरोपी राहुल जगताप याला बेड्या ठोकल्या. नाशिकमध्ये राहणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा एमबीबीएसचं शिक्षण घेतलेला मुलगा डॉक्टर अमित या दोघांचा आरोपीनं गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांची ओळख पटू नये म्हणून त्यांच्यावर दारू टाकून जाळलं आणि आणि नानासाहेब यांचा मृतदेह पालघरमध्ये तर अमित याचा मृतदेह अहमदनगर जिल्ह्यात फेकून दिला.



















