एक्स्प्लोर
Mumbai Monorail: 'अपघात नाही, मॉकड्रिल होतं', MMRDA चा दावा, पण कर्मचारी संघटना अपघाताच्या वृत्तावर ठाम!
मुंबई मोनोरेलच्या (Mumbai Monorail) ट्रायल रनवेळी वडाळा (Wadala) डेपो परिसरात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे, मात्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) हा अपघात नसल्याचं म्हटलं आहे. 'हा कोणताही अपघात नसून आम्ही मॉकड्रिल करत होतो,' असा दावा MMRDA ने केला आहे. याउलट, कर्मचारी संघटनेच्या म्हणण्यानुसार, हा अपघातच होता आणि त्यात काही कर्मचाऱ्यांच्या डोक्याला इजा झाली आहे. या घटनेत मोनोरेलचे चाक निखळल्याचे आणि इंजिनचा फायबर तुटल्याचे दिसून आले. सुरुवातीला, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या घटनेवर बोलण्यास नकार दिला. सध्या प्रवाशांसाठी मोनोरेलची सेवा बंद असून, नवीन डब्यांची चाचणी (Trial Run) सुरू असताना हा प्रसंग घडला. MMRDA कडून जरी हा मॉकड्रिल असल्याचं सांगितलं जात असलं, तरी दृष्य आणि कर्मचारी संघटनेच्या दाव्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















