Mumbai Local TC Clashes : फर्स्ट क्लासचं तिकीट, AC लोकलने प्रवास, TC आणि प्रवाशाची हाणामारी
Mumbai Local TC Clashes : फर्स्ट क्लासचं तिकीट, AC लोकलने प्रवास, TC आणि प्रवाशाची हाणामारी
मुंबईतील चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या जलद वातानुकूलित (एसी) लोकल ट्रेनमधील एका प्रवाशाने तिकीट तपासणीदरम्यान रेल्वे तिकिट तपासणीस याला मारहाण केल्याचा व्हिडिओ वायरल होतं आहे. मुख्य तिकीट निरीक्षक जसबीर सिंग हे तिकीट तपासत असताना त्यांना एसी लोकल ट्रेनमध्ये तीन प्रवासी प्रथम श्रेणीचे तिकीट घेऊन प्रवास करत असल्याचे आढळून आले. सिंग यांनी प्रवाशांना रेल्वेच्या नियमानुसार दंड भरण्यास सांगितले. त्यानंतर दुसरा प्रवासी अनिकेत भोसले याने सिंग यांच्याशी वाद घातला कालांतराने वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. ज्यावेळी लोकल बोरिवली स्थानकावर पोहोचली तेव्हा सिंग यांनी भोसले यांना लोकलमधून उतरण्यास सांगितले पण भोसले यांनी नकार दिला. सिंग यांना झालेल्या मारहाणीत ते जखमी झाले असून प्रवाशाने त्यांचा शर्ट फाडला. ज्यात सिंग यांनी इतर प्रवाशांकडून दंडात्मक स्वरुपात जमा केलेली रक्कम १५०० रुपयेही गहाळ झाल्याचे समोर आले आहे या घटनेचा व्हिडिओ एका प्रवाशाने बनवला असून ज्यामध्ये आरपीएफचे जवान भोसले याला ट्रेनमधून उतरवत असल्याचे दिसत आहे. भोसले याला नालासोपारा येथे ट्रेनमधून उतरवण्यात आले. "या घटनेनंतर, आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु भोसले यांनी नंतर आपली चूक मान्य केली आणि हरवलेले 1,500 रुपये जसबीर सिंग यांना परत केले आणि अधिकाऱ्यांची लेखी माफीनामाही सादर केला. एफआयआर नोंदवला गेला तर त्याच्या नोकरीवर परिणाम होईल या हेतून सिंग यांनीच मोठं मन दाखवत प्रवाशांवर गुन्हा न दाखल करत. सक्त तकीद देऊन सोडले.