Hotels and Temples Reopen | राज्यात रेस्टॉरंट आणि मंदिरं मर्यादित क्षमतेने सुरु करण्याचा विचार
राज्यात येत्या काही दिवसात रेस्टॉरंट आणि मंदिरं मर्यादित क्षमतेने सुरु करण्याचा विचार आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. येत्या 3 ते 4 दिवसात यासंदर्भात ठोस निर्णयाची शक्यता आहे. मार्चपासून बंद असलेली राज्यातील मंदिरं सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. याबाबत विविध पक्षांकडून आंदोलनंही केली जात आहेत. त्याचाच विचार करुन मंदिरं मर्यादित क्षमतेने सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. राज्यातील मंदिरांसाठी ई-दर्शनाच्या माध्यमातून मर्यादित संख्येने देवदर्शन करता येऊ शकेल, अशी पद्धत अवलंबण्यासंदर्भात चर्चा झाली. तसंच ई-दर्शन किंवा मंदिरात जाण्याची वेळ बुक करता येऊ शकेल, अशा पद्धतीबद्दलही टास्क फोस्ट बैठकीत चर्चा करण्यात आली.






















