Mumbai Ajit Pawar PC : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद ABP Majha
Ajit Pawar : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. अधिवेशन काळात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांकडे सोपवायवला हवी होती, असेही विरोधकांनी म्हटले होते. विरोधकांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. चार्ज कोणाला द्यायचा हे आम्ही ठरवू बाहेरच्या लोकांनी नाक खुपसू नये असे अजित पवार यांनी म्हटले.
विधीमंडळ अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. यावेळी त्यांनी म्हटले की, या अधिवेशानात तीन विधेयके मागे घेण्यात आली आहेत. अधिवेशनाचे कामकाज व्यवस्थित पार पाडले असून शक्ती विधेयकालाही या अधिवेशनात मंजुरी देण्यात आली आहे. इम्पिरीकल डेटा संकलित करण्यासाठी 435 कोटी मंजूर करण्यात आल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ठरलेल्या निधीपेक्षा अधिक निधी सरकारने दिला आहे. विदर्भाला 3 टक्के अधिक रक्कम दिली असल्याचे त्यांनी सांगितले.