उद्धव ठाकरे यांची पोलीस महासंचालकांशी चर्चा, विद्यार्थ्याचं आंदोलन संवेदनशीलतेने हाताळण्याच्या सूचना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याशी राज्यात उत्स्फूर्तपणे सुरु झालेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चा केली. विद्यार्थ्याचं आंदोवन संवेदनशीलनेते हाताळण्याच्या सूचना त्यांनी केल्या, अशी सूत्रांची माहिती आहे. एमपीएससी परीक्षेबाबत आजच निर्णय होण्याची शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्था हाताळताना पोलिसांनी आक्रमक कारवाई करु नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं समजतं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती घेतली. हे आंदोलन एमपीएससीचं प्रमुख केंद्र असलेल्या फक्त पुण्यापुरतं मर्यादित न राहता राज्यभरात पसरलं आहे. सर्व संबंधित विभागांच्या मंत्र्यांशी तसंच अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असून लवकरच ते याबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्याचं आंदोलन चिघळणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या पोलीस प्रमुखांना दिल्याचं समजतं