Amravati : अचलपूर शहरात तणाव, MP Navneet Rana यांनी केलं Hindu - Muslim समाजाला शांततेचं आव्हान
Amravati News : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात काल रात्री 10 वाजे दरम्यान दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याचा वादावरून दोन समुदाय पुढे आल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला. दरम्यान या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
परतवाडा, अचलपूर शहरात 144 कलम लागू
काल रात्री 10 च्या सुमारास अचानक झालेल्या वादानंतर अमरावतीच्या अचलपूर आणि परतवाडा शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अचलपूर शहरातील दुल्ला गेट परिसरात झेंडा काढल्याच्या वादातून दोन गट आमने सामने आले आणि वातावरण तापलं. मात्र पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या दोन्ही शहरात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून संचारबंदी सदृश्य स्थिती आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिसांची तुकडी सुद्धा बोलवण्यात आली आहे.