एक्स्प्लोर
Maharashtra Monsoon Update | राज्यात सर्वदूर पाऊस, अनेक धरणं ओव्हरफ्लो Special Report
महाराष्ट्र राज्यात सध्या सर्वदूर पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच भागांतील धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. काही धरणे शंभर टक्के भरली आहेत. यावर्षी जुलैच्या सुरुवातीलाच राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह इतर विभागांतील धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाला आहे. नाशिकमधील तेवीस धरणांपैकी महत्त्वाची सहा धरणे जुलैच्या सुरुवातीलाच शंभर टक्के भरली आहेत. पूर्ण भरल्याने भाम धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरणही सध्या साठ टक्क्यांहून अधिक भरले आहे. भंडाऱ्याचे गोसेखुर्द धरण भरल्याने धरणाच्या पंधरा गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोंदियातील वैनगंगा नदीवरच्या धापेवाडा बॅरेजचे तेरा दरवाजे चार मीटरने उघडण्यात आले आहेत. जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे, पालघरमधील सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून तब्बल चाळीस हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धुळ्यातही पावसामुळे अनेक जलसाठे ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात झाली आहे. पिंपळनेर परिसरात असलेला जामखेली मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर इथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये सध्या साठ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे, तर मोडक सागर, अपर वैतरणा आणि मध्य वैतरणा ही धरणे सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. राज्यभरात सुरू असलेल्या पावसामुळे जलसाठ्यात समाधानकारक वाढ दिसून येत आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
ठाणे
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















