Mohandas Sukhtankar : ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर कालवश, 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं निधन झालंय. वयाच्या 93 व्या वर्षी दीर्घ आजाराने मुंबईतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष नाट्यसेवा केलीय. रायगडाला जेव्हा जाग येते सारख्या अनेक गाजलेल्या नाटकांत त्यांनी अभिनय केलाय. त्याचसोबत ((कैवारी, जावई माझा भला, चांदणे शिंपीत जा, थोरली जाऊ, वाट पाहते पुनवेची अशा)) अनेक मराठी चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. मोहनदास सुखटणकरांनी आपल्या अभिनयातून नाट्य-सिनेसंस्कृतीला वेगळाच आयाम बहाल केलाय. मोहनदास सुखटणकरांच्या निधनाने, मराठी रंगभूमी आणि सिनेमांमधला नटसम्राट काळाच्या पडद्याआड गेलाय.






















