एक्स्प्लोर
Sanjay Gaikwad Case | आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल, अखेर तीन दिवसांनी कारवाई
मुंबईतील आमदार निवासातील कँटीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या आमदार गायकवाडांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन दिवस उलटूनही कोणतीही कारवाई होत नव्हती. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने हे प्रकरण लावून धरले आणि सरकारला यावर कठोर प्रश्न विचारले. आमदारांवर वेगवेगळे कायदे लागू होत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत, अशी एबीपी माझाची ठाम भूमिका होती. या पाठपुराव्यानंतर तीन दिवसांनी का होईना, पण आज आमदार गायकवाड यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत कलम ३५२ (अपमानित करणे), कलम ११५ उपकलम २ (मारहाण करणे) आणि तिसरे कलम उपकलम ५ (संगनमत करून मारणे) हे अदखलपात्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या अदखलपात्र गुन्ह्यांची माहिती मरीन ड्राइव्ह पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे कळविली जाणार आहे. या सर्व घडामोडींनंतरही आमदार संजय गायकवाड यांची आमदारकी मात्र कायम आहे. या घटनेमुळे लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई






















