MLA Disqualification : उद्धव ठाकरे कोणत्याही नेत्याला भेटत नव्हते - राहुल शेवाळे
MLA Disqualification : उद्धव ठाकरे कोणत्याही नेत्याला भेटत नव्हते - राहुल शेवाळे शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आज देखील होणार आहे. नागपुरात सकाळी ८.३० ते ११.३० पर्यंत ही सुनावणी पार पडेल. आज शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत सकाळच्या सत्रात ठाकरे गटाच्या वकिलांनी शिंदे गटाचे नेते दिलीप लांडे यांची तर दुपारच्या सत्रात योगेश कदम यांची उलटतपासणी ठाकरे गटाच्या वकिलांनी घेतली. २५ ऑक्टोबर २०२३ च्या प्रतिज्ञापत्रातल्या चुकांवरुन आमदार कदम यांना सवाल विचारण्यात आले. शिवसेना कार्यकारिणीवरुनही कदम यांना सवाल करण्यात आले. आज राहुल शेवाळे आपल्या साक्षीत नेमकं काय सांगणार हे पाहावं लागेल.























