एक्स्प्लोर

Mission Lotus : भाजपकडून महाराष्ट्रात मिशन लोटस राबवलं जाणार?

Mission Lotus : भाजपकडून महाराष्ट्रात मिशन लोटस राबवलं जाणार?

 भाजप महाविकास आघाडीला लवकरच धक्का देण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार संपर्कात असल्याचा भाजपचा दावा आहे. काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मविआच्या खासदारांमध्ये चलबिचल असल्याच्या चर्चा आहेत. मविआचे खासदार भाजप आणि इतर पक्षांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या गोटातून समोर आली आहे.   राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला सामोरं जाण्यासंदर्भात चर्चा पाहायला मिळत आहेत. लोकसभेला महाराष्ट्रात भाजपला यश मिळालं नव्हतं. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मिशल लोटस राबवलं जाणार असल्याच्या चर्चा आहेत.  प्रविण दरेकर काय म्हणाले?   भाजप नेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीमधील खासदार आणि आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीचे खासदार ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी आहेत, विशेषत: शरद पवार साहेबांचे खासदार जिथं आहेत तिथं महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. त्याचबरोबर विकास हाही त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. जर आपलं राजकीय भविष्य नीट व्हावं असं त्यांना वाटत असेल. केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे. आपल्या मतदारसंघात विकासकामं करणं प्राधान्याचा विषय राहणार आहे. स्वत:चं राजकीय भविष्य, कार्यकर्त्यांचा आग्रह, ज्यासाठी निवडणूक लढवतो तो विकास अशी मानसिकता असेल तर यासाठी शरद पवार साहेबांचे खासदार अशी भूमिका घेऊ शकतात. आपल्याला विकास हवा असेल तर सत्तेच्या माध्यमातून गतीनं विकास करता येतो. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं भक्कम सरकार दोन्ही ठिकाणी आहे. त्यामुळं अशा प्रकारचा निर्णय होऊ शकतो. शरद पवार साहेबांचे असतील किंवा मविआचे खासदार आमच्या नेतृत्त्वाच्या संपर्कात राहण्याची शक्यता आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Mission Lotus : भाजपकडून महाराष्ट्रात मिशन लोटस राबवलं जाणार?
Mission Lotus : भाजपकडून महाराष्ट्रात मिशन लोटस राबवलं जाणार?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
Satish Wagh Case: आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
Mahayuti Cabinet Expansion: मोठी बातमी: खातेवाटपाचा निर्णय आता दिल्लीतच? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीला जाणार
मोठी बातमी: खातेवाटपाचा निर्णय आता दिल्लीतच? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीला जाणार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mission Lotus : भाजपकडून महाराष्ट्रात मिशन लोटस राबवलं जाणार?ABP Majha Headlines :  11 AM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLeader of Opposition : विरोधीपक्षनेते पदासाठी अद्याप मविआकडून अर्ज नाहीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 11 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
Satish Wagh Case: आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
Mahayuti Cabinet Expansion: मोठी बातमी: खातेवाटपाचा निर्णय आता दिल्लीतच? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीला जाणार
मोठी बातमी: खातेवाटपाचा निर्णय आता दिल्लीतच? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीला जाणार
Sanjay Raut: राज्यात भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, मविआचे खासदार फुटणार? संजय राऊत म्हणाले....
राज्यात भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, मविआचे खासदार फुटणार? संजय राऊत म्हणाले....
Ratnagiri: अजस्त्र लाटांमध्ये जायचं धाडस केलं, आतच अडकले, लाटा खेचू लागल्या, अशी झाली मृत्यूच्या दाढेतून सूटका
अजस्त्र लाटांमध्ये जायचं धाडस केलं, आतच अडकले, लाटा खेचू लागल्या, अशी झाली मृत्यूच्या दाढेतून सूटका
Kurla Bus Accident: कुर्ला बस अपघातानंतर बाप मदतीला धावला; अचानक हाती मुलाचाच मृतदेह आला, अंगावर काटा आणणारा क्षण!
कुर्ला बस अपघातानंतर बाप मदतीला धावला; अचानक हाती मुलाचाच मृतदेह आला, अंगावर काटा आणणारा क्षण!
Maharashtra Cabinet Expansion: एकनाथ शिंदेंना नगरविकास खात्यासह एकूण 13 मंत्रिपदं; ठाण्यातील बैठकीला फडणवीस फोनवरुन कनेक्ट, नेमकं काय-काय घडलं?
शिवसेनेला नगरविकास खात्यासह एकूण 13 मंत्रिपदं; ठाण्यातील बैठकीला फडणवीस फोनवरुन कनेक्ट, नेमकं काय-काय घडलं?
Embed widget