Mathura Jail Cricket : मथुरा जेलमध्ये जेल प्रिमियर लीग, रंगले क्रिकेटचे सामने
Mathura Jail Cricket : मथुरा जेलमध्ये जेल प्रिमियर लीग, रंगले क्रिकेटचे सामने
चार भिंतीत राहणाऱ्या कैद्यांचे मनोरंजन करण्यासाठी आणि त्यांचा ताण कमी करण्यासाठी मथुरा तुरुंग प्रशासनाने अनोखा उपक्रम सुरु केलाय. आयपीलच्या धर्तीवर मथुरा जेलमध्ये जेल प्रीमियर लीग सुरु करण्यात आलं आहे. उत्तरप्रदेशच्या मथुरेत आता चौकार षटकाराचा पाऊस पडत असून कैद्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी, त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि मानसिक ताणापासून मुक्त करण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आल्याचं मथुरा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मथुरेच्या तुरुंगातील कैद्यांचा क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. (Jail Premier League)
आता तुरुंगातही क्रिकेटचं मैदान
या व्हिडिओमध्ये तुरुंगाच्या आवारातील एका मैदान फुग्यांनी सजवण्यात आले आहे. या मैदानात कैद्यांचा जेल प्रीमियर लीग चांगलाच रंगल्याचे दिसले. एकूण आठ संघांनी या लीगमध्ये भाग घेतला होता. महिनाभर चाललेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाईट रायडर्स या संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा पराभव केला. गेल्या एक महिन्यापासून मथुरा येथे जेल प्रीमियर लीग 2025 चे आयोजन करण्यात आले होते. त्यात आठ संघांनी भाग घेतला होता, प्रत्येकी चार संघांना गट अ आणि गट ब मध्ये स्थान देण्यात आले होते. असे तुरुंग प्रशासनाने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या























