Latur Rain Update : मांजरा नदीला पूर, शेतात अडकलेल्या सालगड्याला NDRFच्या मदतीनं वाचवलं
निलंगा तालुक्यातील मुगाव - मसलगा गावाच्या मध्ये वांजरखेडा शिवारात मांजरा नदीच्या पुराचे पाणी चहुबाजूने असल्यामुळे शिवाजी भिमराव कुदरे हा व्यक्ती सालगडी म्हणून एकाच्या शेतात अडकल्याची माहिती रात्री प्रशासनाला मिळाली. सकाळी तहसीलदार गणेश जाधव व एनडीआरएफची टीम घटनेच्या ठिकाणी आले असून एक तासात बाहेर काढले आहे. कालच संबंधित सालगडी कुदरे यांनी आपले कुटूंब सुरक्षित स्थळी पाठवून ते घरी थांबले होते मात्र पाण्याचा प्रवाह सर्व बाजूने वेढल्याने त्यांना बाहेर निघणे मुश्कील झाले. अखेर माजी पंचायत समिती सदस्य सुरेंद्र धुमाळ यांनी तत्काळ ही माहीती प्रशासनाला दिली. व त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार गणेश जाधव यांनी दिली आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
