एक्स्प्लोर
Bogus Voters Row: मतदार यादीत घोळ, मराठवाड्यात आरोप-प्रत्यारोप
मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून मतदार यादीतील घोळ, अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आणि निधीचा अभाव हे प्रमुख मुद्दे चर्चेत आहेत. 'गंगापूर मतदारसंघामध्ये अनेक अशी नावं आहेत की जे अस्तित्वातच नाहीत', असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे. दुसरीकडे, सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांनी ५०० पेक्षा अधिक मतदार नोंदवल्याचा आरोप भाजपने केला आहे, ज्यामुळे सत्ताधारी महायुतीमध्येच संघर्ष निर्माण झाला आहे. या निवडणुका सर्वच पक्षांसाठी, विशेषतः दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे गट, भाजप आणि एमआयएमसाठी, ग्रामीण भागातील आपली ताकद आजमावण्याची संधी आहे. दरम्यान, इच्छुकांची नाराजी कमी करण्यासाठी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये ५ स्वीकृत सदस्य घेण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
















