Maratha Reservation | मराठा आरक्षणावर आजपासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी
मराठा आरक्षण प्रकरणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे. तीनच दिवसात ही सुनावणी पूर्ण होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्याचं सुप्रीम कोर्टात काय होणार या उत्तरासाठी आता फार प्रतीक्षा करावी लागणार नाही.
सुप्रीम कोर्टात 15 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत कोणताही अंतरिम आदेश किंवा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती दिली नाही. मात्र मराठा आरक्षणावरच्या अंतिम सुनावणीची तारीख निश्चित केली. 27 जुलैपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होईल आणि केवळ तीन दिवसांतच सुप्रीम कोर्ट या सुनावणीचा निपटारा करणार आहे. दीड दिवस याचिकाकर्त्यांना तर दीड दिवस दुसऱ्या बाजूला युक्तिवादासाठी मिळणार आहे.


















