Manoj Jarange : आरक्षणापासून जातींना वेगळं करू शकत नाही - मनोज जरांगे
Manoj Jarange : आरक्षणापासून जातींना वेगळं करू शकत नाही - मनोज जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांच्या नावाने एरवी खडे फोडणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी चक्क देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलंय. परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क माफ करत मुलींना मोफत शिक्षण दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे कौतुक करत आमचा विरोधक छगन भुजबळ असल्याचे मनोज जरांगे म्हणालेत. जालन्यातील अंतरवाली सराटीत आज त्यांनी पाचव्यांदा आमरण उपोषणास सुरुवात केली असून सकाळीच त्यांनी मराठा समाजातील मुलांना नोकर भरती ऍडमिशनमध्ये अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार केली होती. फडणवीस साहेबांचे याबाबत कौतुक - मनोज जरांगे ईबीसी, ईडब्ल्यूएस आणि एसबीईसी उमेदवारांकडून परीक्षा शुल्क आणि फीस घेऊ नका असे आदेश सरकारने दिल्याबद्दल मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारचे कौतुक केले आहे. ज्यांनी परीक्षा शुल्क, फीस भरली आहे त्यांना ते शुल्क वापस करा असे म्हटलंय. "या बद्दल फसणवीस साहेबांचे, शिंदे, अजित पवार साहेबांचे मनापासून कौतुक" असं म्हणत आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देणं सुलभ करण्याची विनंती मनोज जरांगे यांनी सरकारला केली. सरकार विरोधात आक्रमक होणारे मनोज जरांगे यांनी अचानक सरकारचे कौतुक केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.