Advait Hire Case Update : मालेगावचे नेते अद्वय हिरे यांना भोपाळमधून अटक
ठाकरे गटाला जोरदार दणका बसलाय. कारण मालेगावचे नेते अद्वय हिरे यांना भोपाळमधून अटक करण्यात आली आहे. हिरे यांनी रेणुका सूतगिरणीसाठी NDCC बँकेकडून साडेसात कोटींचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज न फेडल्यानं एकूण रक्कम ३० कोटींच्या वर गेली होती. पैशांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यानंतर हिरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टानं जामीन नाकारला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीनं अटक केली. हिरे हे दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. महत्त्वाचं म्हणजे काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंची मालेगावात सभा झाली होती. त्याचे आयोजक हिरेच होते. मालेगावचे पुढचे आमदार हिरे असतील अशी भविष्यवाणी तेव्हा संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.























