Malegaon Election : माळेगावची प्रत्येक निवडणूक लढणारा पठ्ठ्या, कारण ऐकून चकीत व्हाल
Malegaon Election : माळेगावची प्रत्येक निवडणूक लढणारा पठ्ठ्या, कारण ऐकून चकीत व्हाल
Malegaon sugar factory election result 2025: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू आहे. मध्यरात्री दीड वाजता पहिल्या फेरीची मतमोजणी (Vote Counting) पूर्ण झाली असून आज दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीचा कल पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पॅनलला यश मिळताना दिसत आहे. अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या 16 उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत.
यामध्ये अत्यंत चुरशीच्या सांगवी गटामध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रणजीत खलाटे हे उमेदवार आघाडीवर आहेत तर बारामती गटामधून अजित पवार गटाचे देविदास गावडे हे आघाडीवर आहेत. याशिवाय तावरे गटाचे उमेदवार जीबी गावडे हेदेखील आघाडीवर आहेत. महिला गटामधून अजित पवार गटाच्या संगीता कोकरे आघाडीवर आहेत. तर सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीची मतमोजणी पहाटे पाच वाजता सुरु करण्यात आली असून या कारखान्याच्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अंतिम निकाल काय लागणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.





















