Majha Gaon Majha Jilha | माझा गाव माझा जिल्हा! राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा | 13 July 2024
Majha Gaon Majha Jilha | माझा गाव माझा जिल्हा! राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा ABP Majha
सोलापुरात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण संपन्न, या रिंगणाची ड्रोन दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज अकलूज मुक्कामी, माळीनगरमध्ये पहिले उभे रिंगण पार पडणार.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरीमध्ये पुन्हा पाऊस, सकाळपासून बहुताश भागात पाऊस , १६ जुलैपर्यंत जिल्ह्याला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट.
रायगडमध्येही जोरदार पावसाची हजेरी, आजपासून पुढचे चार दिवस रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट.
पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी, बोईसर,डहाणू आणि चारोटी परिसरात मुसळधार पाऊस.
गोंदिया जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे वातावरणात गारवा, शेतीकामांनाही वेग येणार.
रायगडाच्या पायी मार्गावरील वाळसुरे खिंडीजवळ कोसळली दरड, चार दिवसांपूर्वीच रायगड किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आल्यानं कोणतीही जीवितहानी नाही.