Majha Gaon Majha Jilha | माझा गाव माझा जिल्हा! राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा ABP Majha
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा, गरजेच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं आवाहन
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळाही राहणार बंद.. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रशासन सतर्क
विधान परिषद निवडणुकीमुळे मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल्सना अच्छे दिन, ठाकरे गट, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार
((वि. परिषद निवडणुकीमुळे हॉटेल्सना अच्छे दिन!))
मुंबईत CNG आणि PNGच्या दरात वाढ, CNG प्रति किलो दीड रुपयानं महागला
((मुंबईत CNG, PNG महागले))
वरळी हिट अँड रन अपघातानंतर आरोपी मिहीर शाहानं वडिलांना अनेकदा फोन केला, मुंबई पोलिसांची कोर्टाला माहिती, वडील राजेश शाहांना जामीन
((अपघातानंतर वडिलांना अनेकदा फोन?))
जम्मू-काश्मिरच्या कठुआत लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा हल्ला, चार जवान शहीद, सहा जखमी.
गँगस्टर अरुण गवळीच्या केससंबंधीची महत्त्वाची कागदपत्रं मुंबई पोलिसांकडून गहाळ, क्राइम ब्रँचकडून मुंबई सत्र न्यायालयात कबुली
((केसची कागदपत्रं गहाळ कशी झाली? ))
बीसीसीआयचे सचिव जय शाह आयसीसीचे अध्यक्ष होण्याची शक्यता, मात्र अद्याप ठोस निर्णय घेतला नसल्याची माहिती
((जय शाह ICCचे अध्यक्ष होणार?))