mit Thackeray Win Mahimkar Pray Ekvira Devi अमित ठाकरेंच्या विजयासाठी माहीमकरांचा एकवीरा देवीला नवस
Amit Thackeray Win Mahimkar Pray Ekvira Devi अमित ठाकरेंच्या विजयासाठी माहीमकरांचा एकवीरा देवीला नवस
मनसेचे माहीम विधानसभेचे उमेदवार अमित ठाकरे यांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत यश प्राप्त होण्यासाठी माहीम कोळीवाड्यातील कोळी बांधव आणि महारष्ट्र सैनिक एकविरा आईची ओटी भरत, नवस करणार आहेत. एकविरेला जाण्यापूर्वी कोळी बांधव आणि महाराष्ट्र सैनिक देवीची ओटी घेऊन शिवतेर्थावर अमित ठाकरेंची भेट घेत एकविरेला रवाना होणार आहेत.माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित ठाकरे यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. त्यांच्यावर एकूण १३.८३ कोटी रुपयांची मालमत्ता आणि ४.१९ कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांच्यावर १.७२ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ठेवी, शेअर्स आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आहे. अमित आणि मिताली दोघांचा व्यवसाय ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्ह आहे. अमित ठाकरे यांच्या नावावर १२ कोटी ५४ लाख रुपयांची एकूण जंगम मालमत्ता आहे. तर १ कोटी २९ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे सध्याच्या घडीला १ लाख ८ हजार रुपये रोख रक्कम आहे. तर बँक खात्यात ४० लाख ९९ हजार ७६३ रुपये इतकी रक्कम आहे. ६ कोटी २९ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. तर शेअर्स ३ कोटी ९८ लाख रुपयांचे आहेत. तसेच त्यांची पोस्ट खात्यात 20 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. अमित ठाकरे यांच्या नावावर एकही गाडी नाही. तसेच त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्याकडे 3 तोळे सोने आहेत. पत्नी मिताली ठाकरे यांच्या नावे किती संपत्ती? पत्नी मिताली ठाकरेच्या नावे – १ कोटी ७२ लाख एकूण जंगम मालमत्ता – ५८ लाख ३८ हजार ५८७ ठेवी- ५ कोटी ९३ लाख म्युचूअल फंड -५२ लाख सोने -९ तोळे मुलाच्या नावावर ७० हजार मुलाच्या नावे म्युच्यूअल फंड – ६० लाख तथास्तु बिल्डर्समध्ये २० टक्के भागिदारी सह्याद्री फिल्ममध्ये ५० टक्के शेअर्स व्यवसाय-ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्ह