(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahayuti Seat Sharing : असा असू शकतो महायुतीचा जागा वाटप फाॅर्म्युला
Mahayuti Seat Sharing : असा असू शकतो महायुतीचा जागा वाटप फाॅर्म्युला
महायुतीत जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महायुतीतील प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणूनच या तिन्ही पक्षांत जागांच्या मुद्द्यावरून कोणताही ठोस तोडगा निघत नाही. दरम्यान, शुक्रवारी (19 ऑक्टोबर) दिल्लीत झालेल्या बैठकीत महायुतीतील जागावाटपाचा (Mahayuti Seat Sharing) मुद्दा निकाली लागल्याचे म्हटले जात आहे. आता मोजक्याच जागांचा प्रश्न असून लवकरच त्या जागांचेही वाटप होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीतील ही बैठक पार पडली.
रात्री अडीच तास चालली बैठक
महाराष्ट्र विधानसभेचा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दिल्लीमध्ये गेले होते. या तिन्ही नेत्यांची अमित शाहा यांच्यासोबत रात्री उशिरा एक बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीतील जागावाटपावर चर्चा झाली. ज्या जागांवर वाद चालू होता, तो सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये महायुतीला बऱ्यापैकी यश आल्याचे म्हटले जात आहे. अमित शाह यांच्या निवासस्थानी पार पडलेली ही बैठक एकूण अडीच तास चालली. जागावाटपाचा तिढा अमित शाह यांच्या समक्ष सोडवण्यात आला असून आता फक्त काहीच जागांचा प्रश्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.