Maharashtra : सहा जिल्ह्यात झेडपीच्या 85 तर पंचायत समितीच्या 144 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण
Maharashtra ZP Panchayat Samiti By-elections : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. आजच्या निवडणुकीसाठी काही ठिकाणी उत्साह तर काही ठिकाणी मतदान केंद्रांवर शुकशुकाट पहायला मिळाला. दरम्यान, किरकोळ घटना वगळता सर्व जिल्ह्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
कोरोनासंकट आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्रातील 6 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झाले. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, पालघर आणि नागपूर जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका होणार पार पडल्या. आज सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरूवात झाली. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत सर्व ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पाडली गेली आहे.