(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Osmanabad Rain : उस्मानाबादमध्ये मुसळधार पाऊस; पावसानं अन् पुरानं वाट अडवली
मुसळधार पावसानं नागरिकांची वाट अडवली आहे. परळी अंबाजोगाई रस्त्यावरची वाहतूक सध्या बंद झाली आहे. तर कण्हेरवाडी लगतच्या पुलाचं काम सुरु असल्यानं पर्यायी मार्गावरुन वाहतूक सुरु ठेवण्यात आली होती, पण पाणी पातळीत वाढ झाल्यानं ही वाहतूकही बंद करण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी गावाला लागून तेरणा नदी वाहते. दरवर्षी या नदीला पाण्याची टंचाई असते, पण काल संध्याकाळी आणि रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसाने तेरणा नदीचं पाणी उजनी गावातील बाजारपेठेत शिरलं. या बाजारपेठेत असलेले हॉटेल्स, सलून, कृषी साहित्य विक्रीची दुकाने पानटपरी यासारख्या 20 ते 25 दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. या दुकानातील साहित्य पुराच्या पाण्यात भिजून नुकसान झालं आहे. गावाच्या मुख्य बाजारपेठेचा 50 टक्क्यांपर्यंत भाग हा पुराच्या पाण्यात बुडाला असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.