एक्स्प्लोर
Maharashtra Political Row | परशुराम महामंडळात IAS अधिकारी नेमणुकांवरून वाद, पवारांचा टोला, फडणवीसांचे उत्तर
राज्यातील महामंडळांमध्ये पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. ब्राह्मण समाजासाठी असलेल्या परशुराम विकास महामंडळावरती सहा आयआयएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला टोला लगावला. समाजाच्या उन्नतीसाठी नेमलेल्या आर्थिक विकास महामंडळावर चांगले कार्यक्षम अधिकारी नेमावेत आणि पुरेसा निधी देऊन कामाला गती द्यावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. "त्यांच्या डोक्यात जातिवाद होता ना?" असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली. सर्व महामंडळे सक्रिय होत असून, कंपनी आणि उपकंपनी स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच संचालक नेमले जातात असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी जलालाबाद नगरे आता परशुरामपुरी असे ट्विट केले. योगी सरकारच्या नामांतर प्रस्तावाला केंद्राची परवानगी मिळाली आहे. परशुराम विकास महामंडळ हे ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी काम करते. या महामंडळावर राष्ट्रवादीचे आशिष दामले यांची नियुक्ती झाली होती आणि ते एकटेच काम करत होते. आता सहा शासकीय संचालकांची नियुक्ती झाली असली तरी, सात अशासकीय सदस्यांची नियुक्ती अजून रखडली आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण






















