एक्स्प्लोर
Nishikant Dube On Thackeray Brothers | महाराष्ट्राबाहेर या पटकून मारू, निशिकांत दुबेंची ठाकरेंना धमकी
मूळ भाजपा पक्ष मेलेला असून इतर पक्षांतील नेत्यांना आणून रडारड सुरू आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. भाजपाचे राजकारण गलिच्छ आणि हिणकस असून ते मराठी माणसाचे मारेकरी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी जोरदार विजय मिळवावा असे म्हटले. मराठी बोलायला नकार देणाऱ्यांविरोधात कायदा हातात घेत मारहाण करणाऱ्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात भाजप नेते आक्रमक झाले आहेत. झारखंडचे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना 'महाराष्ट्राबाहेर पटकून मारू' अशी धमकी दिली आहे. महाराष्ट्रात खाणी किंवा उद्योग नाहीत, तुम्ही कोणाच्या जीवावर जगता, असे बेजबाबदार वक्तव्यही दुबेंनी केले. भाजपा आमदार आणि महाराष्ट्राचे मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या आंदोलनाची तुलना पहलगाम हल्ल्याशी केली. एखादा मुद्दा लावून धरण्यासाठी कायदा हातात घेणे किंवा राजकारणासाठी धार्मिक मुद्दा उपस्थित करणे कितपत योग्य, असा सवाल भाजप नेत्यांकडून विचारला जात आहे. निशिकांत दुबे यांनी 'हिंमत असेल तर महाराष्ट्रातील मुस्लिम, तमिळ, तेलुगू यांना मारून दाखवा' असे आव्हान दिले. महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिकांचा आणि मराठी भाषेचा सन्मान करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचे हे कृत्य घटिया असल्याचेही दुबे म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराष्ट्राबाहेर आम्हाला धंदे-व्यवसाय करायला जाण्याची गरज नाही, तुमची लोक आमच्याकडे येतात, असे विरोधकांनी म्हटले.
महाराष्ट्र
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
आणखी पाहा






















