गोंडवाना विद्यापीठ कुलगुरु निवडीचे सर्वाधिकार राज्यपाल कार्यालयाकडे : मंत्री उदय सामंत
गडचिरोली : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना एबीपी माझाने गोंडवाना विद्यापीठबाबत उचललेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या कारभारावर ताशेरे ओढले सोबतच कुलगुरूची निवड हा विषय आमच्या अखत्यारीत येत नसल्याचेही सांगून राज्यपाल कर्यालावर उघड नाराजीही व्यक्त केली. 3 महिन्यापूर्वी राजेंद्र कुमार शर्मा दिल्ली आय आय टी यांची कुलगुरू पदी नियुक्ती झाली होती. मात्र त्यांनी कुठलेही कारण न देता रुजू होण्यास नकार दिला. या प्रक्रियेवर विद्यापीठाचे तब्बल 34 लाख रुपये खर्च झाले होते. त्यामुळे कुलगुरू निवडीची प्रक्रिया पुन्हा घेण्याचे नामुशकी विद्यापीठावर ओढविलेली आहे.























