Mahadev Thackeray : शिवसैनिक महादेव ठाकरे यांच्या कथित धमकीची ऑडिओ क्लिप 'माझा'कडे ABP Majha
शिवसैनिक महादेव ठाकरे यांच्या कथित धमकीची ऑडिओ क्लिप 'माझा'च्या हाती लागली असून महामार्ग कंत्राटदाराला कशाप्रकारे धमकावत आहे ते दिसून येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे अनेक कामं सुरु आहेत. मात्र या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचं नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हे लोकप्रतिनिधी नियमबाह्य मागण्या करत अधिकारी आणि कंत्राटदारांना काम करण्यापासून रोखत असल्याचंही गडकरींनी या पत्रात म्हटलंय. हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल, महाराष्ट्र जनतेचे नुकसान होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.





















