एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja Immersion Delay | ३३ तासांनी 'Lalbaugcha Raja' चे विसर्जन, भाविकांचा संयम
राज्याच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा अभूतपूर्व खोळंबा झाला. सहा सप्टेंबरला दुपारी बारा वाजता सुरू झालेली मिरवणूक तब्बल तेहेतीस तासांनी, सात सप्टेंबरच्या रात्री उशिरा अखेर गिरगाव चौपाटीवर विसर्जनानं संपन्न झाली. यंदा लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गुजरातमध्ये बनवण्यात आलेल्या मोटरायज्ड तराफ्याचा वापर करण्यात आला. मात्र या तराफ्यावर मूर्ती विराजमान करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट ठरली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर मूर्ती तराफ्यावर स्थिर करण्यात यश आले. मूर्ती तराफ्यावर विराजमान झाल्यानंतरही समुद्रामध्ये योग्य भरतीची प्रतीक्षा करावी लागली. भरतीची योग्य पातळी रात्री नऊ वाजता प्राप्त झाल्यावर विसर्जनाची प्रक्रिया सुरू झाली आणि लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं. तेहेतीस तास रखडलेल्या प्रक्रियेमुळे लाखो भाविकांना अपार संयम आणि श्रद्धेची कसोटी लागली. सकाळच्या वेळेस समुद्राला भरती सुरू झाली होती. तराफ्याची उंची जास्त असल्याने मूर्ती उचलून ठेवण्यात अडचणी आल्या. भरतीच्या लाटांमुळे मूर्ती तराफ्यावर ठेवण्यात अडथळे आले.
महाराष्ट्र
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Mumbai bmc election result politics : शिंदेंनी नगरसेवक का लपवले? महापौर पदासाठी शिंदेंचा अट्टाहास?
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















